अमेरिकन न्युज ; चीनचा जबरदस्त झटका! ७ वर्षांत पहिल्यांदा सोयाबीन आयात केली शून्य
अमेरिकन न्युज ; जगातील सर्वात मोठा सोयाबीन आयातदार असलेल्या चीनने अमेरिकेला व्यापारयुद्धात जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
ट्रेड वॉर आणि अमेरिकेने लावलेल्या टॅरिफला उत्तर म्हणून चीनने सप्टेंबर महिन्यात अमेरिकेकडून एक टनही सोयाबीन आयात केलेला नाही. नोव्हेंबर २०१८ नंतर पहिल्यांदाच असे घडले आहे, ज्यामुळे जागतिक बाजारपेठेत खळबळ उडाली आहे.
महत्वाचे मुद्दे:
‘झिरो’ आयात: सप्टेंबरमध्ये चीनची अमेरिकेकडून सोयाबीन आयात शून्यावर.
अमेरिकन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान: या निर्णयामुळे अमेरिकेतील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले आहे.
चीनचा नवा मार्ग: अमेरिकेऐवजी चीनने आता ब्राझील आणि अर्जेंटिनासारख्या देशांकडून सोयाबीनची खरेदी वाढवली आहे. (ब्राझीलकडून आयात २९.९% नी वाढली.)
रणनीतीचा वापर: अमेरिकेला त्यांच्याच व्यापार धोरणाने उत्तर देण्यासाठी चीनने हा मोठा निर्णय घेतला आहे.
जागतिक व्यापार संघर्षातील ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोड आहे.