कर्जमाफी वर देवेंद्र फडणवीस काय म्हनाले पहा, बच्चू कडूंच्या उपोषणावर फडणवीसांच वक्तव्य
“सरकारने पहिल्या दिवशीपासनं सकारात्मक भूमिका ठेवलेली आहे. आंदोलनाच्या आधी देखील आम्ही बैठक बोलवली होती आपण चर्चा करून यातनं ज्या गोष्टी शक्य आहेत त्या करू अशा प्रकारे आम्ही सांगितलं होतं. पहिल्यांदा बच्चू कडूंनी त्याला मान्यताही दिली होती. त्यानंतर त्यांनी अर्ध्या रात्री मला संदेश पाठवला की, ‘लोक जमा होतील, आम्ही असणार नाही, याच्यामुळे अडचण होऊ शकते त्यामुळे आम्ही काही बैठकीला येऊ शकणार नाही.’ त्यामुळे मग आम्ही ती बैठक रद्द केली. आजही बावनकुळे साहेबांनी त्यांच्याशी संपर्क केलेला आहे. शेवटी त्यांनी इतके वेगवेगळे प्रश्न मांडलेले आहेत, ते प्रश्न असे नुसते आंदोलनाच्या माध्यमातनं त्या ठिकाणी सोडवू शकू अशी परिस्थिती नाहीये. त्याच्यावर चर्चा करून त्याचा रोड मॅप तयार करावा लागेल. त्यामुळे त्यांना चर्चेचे निमंत्रण देखील आम्ही दिलेलं आहे.”
“आणि यासोबत आता काल आपण बघितलं असेल तर खूप मोठ्या प्रमाणात लोकांनाही त्रास झालेला आहे. रस्ते अडवल्यामुळे पेशंट्स… खूप मोठी ओरड आपल्याला पाहायला मिळाली. अनेक लोकांनी सोशल मीडियात पोस्ट केलेला आहे की कशा प्रकारच्या पेशंट्सला वगैरे त्या ठिकाणी त्रास झालेला आहे. त्यामुळे माझं आव्हान आहे की त्यांनी चर्चा करावी, अशा प्रकारचं डिसरप्शन करू नये, लोकांना त्रास होईल अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी करू नये. मग अनेक वेळा अशा आंदोलनांमध्ये काही हवसेन, नवसे, गवसे असेही शिरतात. म्हणजे तिथे जेनुन लोक देखील आहेत, मी काही तसं म्हणत नाही, पण हा पण धोका असतो की अनेक लोक शिरून, अनेक प्रवृत्ती शिरून त्या ठिकाणी काही ना काही हिंसक वळण त्याला कसं लाभेल, असही प्रयत्न करत असतात. त्यामुळे त्यापासूनही सावध राहण्याची आवश्यकता आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत हे रेल रोको आणि बाकी गोष्टी या मात्र करणं योग्य नाही. त्या करू दिल्या जाणार ही नाहीत.”
“त्यामुळे आमचं स्पष्ट आव्हान आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही सकारात्मक आहोत. या सरकारने ३२ हजार कोटी रुपयांचं पॅकेज दिलंय, पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही देतो आहोत. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या चर्चेची सरकारची तयारी आहे, चर्चा करावी आणि त्यातनं मार्ग काढावा. (प्रश्न: सर, ही प्रमुख मागणी कर्जमाफीची मागणी आहे.) सरकारने अतिशय स्पष्ट भूमिका त्याच्यात मांडली आहे. आम्ही त्याची कमिटी पण तयार केलेली आहे. आणि आज पहिला प्रश्न असा आहे की, जे शेतकरी आज अडचणीत आहेत, ज्यांचा शेतमाल पूर्ण पावसामुळे त्या ठिकाणी झोपलाय, तो खराब झालेला आहे, शेती खराब झाली आहे, पहिले त्यांना मदत करायची की पहिले बँकांना मदत करायची, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
म्हणजे शेवटी आपण हे बघितलं तरी आपण जेव्हा कर्जमाफी करतो, त्यावेळेस ते पैसे बँकांना जातात. त्याचा थेट शेतकऱ्याला काही लाभ मिळतो असं नाहीये. त्यामुळे आज पहिल्यांदा शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे दिले पाहिजेत. नंतर आम्ही कधीच कर्जमाफी करणार नाही अशी भूमिका घेतलीच नाहीये. (प्रश्न: स्टेटली फिजिबल आहे का?) त्या संदर्भात म्हणूनच म्हटलं, योग्य वेळी आम्ही त्या संदर्भातल्या जे काही निर्णय आहेत ते करू. आज पहिली आवश्यकता काय आहे? आज जी आवश्यकता त्याच्यावर विचार न करता आपण बाकी गोष्टींवर विचार करणं… आज शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेले पाहिजेत, ते पैसे जाणं सुरू झालेलं आहे.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनासंदर्भात सरकारच्या भूमिकेवर सविस्तर भाष्य केले आहे. सरकारने पहिल्या दिवसापासून या प्रश्नांवर सकारात्मक दृष्टिकोन ठेवला असून, आंदोलनापूर्वीच चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. बच्चू कडू यांनी सुरुवातीला संमती दिली होती, परंतु नंतर रात्री उशिरा अचानक ही बैठक रद्द केली. यानंतरही भाजपने त्यांच्याशी संपर्क साधला आहे. आंदोलकांनी उपस्थित केलेले प्रश्न हे इतके गुंतागुंतीचे आहेत की ते केवळ रस्त्यावर आंदोलन करून सुटणार नाहीत; त्यासाठी सविस्तर चर्चा आणि एक योग्य ‘रोड मॅप’ तयार करणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले…
या आंदोलनामुळे लोकांना आणि विशेषतः रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला आहे, याचे अनेक पुरावे सोशल मीडियावर पाहायला मिळाले. त्यामुळे आंदोलकांनी लोकांसाठी अडथळा ठरेल अशा गोष्टी करणे योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना तातडीने चर्चा करावी, असे आवाहन केले आहे. तसेच, आंदोलनामध्ये काही हवसे, नवसे, गवसे प्रवृत्तीचे लोकं शिरून त्याला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न करू शकतात, असा इशारा देत सावधगिरी बाळगण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. ‘रेल रोको’सारख्या गोष्टी करणे योग्य नाही आणि त्या खपवून घेतल्या जाणार नाहीत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक असून, या सरकारने आतापर्यंत ३२ हजार कोटी रुपयांचे मोठे पॅकेज दिले आहे आणि हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जात आहेत. कर्जमाफीच्या मागणीवर बोलताना त्यांनी भूमिका स्पष्ट केली. कर्जमाफी केल्यास पैसे थेट बँकांना मिळतात, तर आजची सर्वात मोठी गरज ही नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत पोहोचवणे ही आहे. त्यामुळे सध्याचे लक्ष शेतकऱ्यांच्या हातात रोख मदत देण्यावर आहे.
सरकारने कर्जमाफीसाठी एक समिती नेमली असून, ती तात्काळ करणार नाही, पण योग्य वेळी व्यवहार्यता तपासून त्या संदर्भातील निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले…










