गहू पेरणीपूर्वी लिहोसिनची बिजप्रक्रीया ; पहा फायदे आणि योग्य पद्धत
गहू पिकाचे चांगले आणि अधिक उत्पादन घेण्यासाठी योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये पेरणीपूर्वी बियाण्यांवर प्रक्रिया करणे महत्त्वाचे ठरते. बिजप्रक्रीया करताना लिहोसिन जर वापरले तर फाय फायदे होतात याबाबत सविस्तर माहिती पाहुयात…
लिहोसिन (Lihocin) हे एक प्रभावी वनस्पती वाढ नियंत्रक (Plant Growth Regulator – PGR) आहे, ज्याला क्लोरो-कोलीन क्लोराईड या नावानेही ओळखले जाते. गव्हाच्या बियाण्याला लिहोसिनची प्रक्रिया केल्याने जास्तीत जास्त फुटवे निघतात.. पिकाच्या वाढीचे नियंत्रण होते आणि अनेक मोठे फायदे मिळतात, ज्यामुळे उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.
गहू पेरणीपूर्वी बिजप्रक्रिया करताना लिहोसिनचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.लिहोसिन वापरण्याची शिफारस केलेली मात्रा म्हणजे प्रति किलो बियाण्यासाठी 3 मिली लिहोसिन असते. हे ग्रोथ रेग्युलेटर पिकाची अनावश्यक वाढ नियंत्रित ठेवते आणि भरपूर फुटवे काढते. या प्रक्रियेमुळे गव्हाचे रोपटे मर्यादित उंचीचे राहते आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे गहू जोरदार हवा आली तरी “पडत नाही”. यामुळे पीक नियंत्रणात राहते आणि जमिनीवर लोळत नाही.
गहू पीक मोठे झाल्यावर, विशेषत: दाणे भरण्याच्या काळात, जोरदार हवा किंवा वादळ आल्यास पीक जमिनीवर लोळते (Lodging). पीक लोळल्यामुळे दाणे भरण्याची प्रक्रिया थांबते, गव्हाच्या दाण्याची गुणवत्ता बिघडते आणि उत्पादनात मोठी घट होते. लिहोसिनच्या वापरामुळे गव्हाची उंची नियंत्रित राहते आणि रोपाला बळकटी मिळते, ज्यामुळे पीक वाऱ्याने पडत नाही.
जास्तीत जास्त फुटवे निघाले तार जास्तीत जास्त ओंब्या सुद्धा लागतात आणि उत्पादनात मोठी वाढ होते..अशा प्रकारे, लिहोसिन पिकाला प्रतिकूल हवामानापासून वाचवून स्थिर आणि चांगले उत्पादन मिळण्यास मदत करते. त्यामुळे बियाणे प्रक्रियेमध्ये लिहोसिनचा समावेश करणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते.