चक्रीवादळ येतंय ; राज्यात मोठ्या पावसाचे संकेत, दिवाळी पावसात..तोडकर साहेब
हवामान अभ्यासक तोडकर यांच्या अंदाजानुसार, सध्याच्या काळात महाराष्ट्रात मोठ्या पावसाची शक्यता असून ही पावसाची शक्यता बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे तयार झाली आहे. हे चक्रीवादळ थेट महाराष्ट्रात येणार नसले तरी, त्याच्यामुळे तयार झालेले बाष्पयुक्त वातावरण राज्यात पावसासाठी अनुकूल ठरणार आहे.
नाशिक क्षेत्रामध्ये आजपासूनच (१९ ऑक्टोबर) या पावसाचे पडसाद दिसू लागले आहेत, तसेच जळगाव, मालेगाव आणि धुळे भागांमध्येही तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसाचा जोर २२ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबरपर्यंत कायम राहील, मात्र तो सर्वदूर नसून भाग बदलत आणि मोजक्या ठिकाणी पडणार आहे असा अंदाज तोडकर यांनी दिलाय…
राज्यात हा पाऊस मुख्यतः तीन विभागांवर आपला प्रभाव दाखवेल. मराठवाडा विभागात बीड, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली यांसारख्या जिल्ह्यांमध्ये पावसाची चांगली व्याप्ती राहील. काही भागांमध्ये जोरदार पाऊस अपेक्षित आहे, विशेषत: संभाजीनगर (औरंगाबाद) आणि बीडच्या काही क्षेत्रांमध्ये तुफान पाऊस होऊ शकतो, तर उर्वरित ठिकाणी हलक्या सरी राहतील.
पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रात सांगली, कोल्हापूर, सातारा आणि पुणे या भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. सांगलीसारख्या ठिकाणी अतिमुसळधार पावसाची नोंद होऊ शकते, परंतु तो केवळ २५% क्षेत्रांमध्ये भाग बदलत पडेल. याव्यतिरिक्त, पूर्व विदर्भ आणि उत्तरेकडील अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्येही हवामान बिघडणार आहे. (तोडकर हवामान अंदाज)
शेतकरी बांधवांनी आपली पेरणी थांबवू नये. ज्वारीसारखी पिके ज्यांचे नुकसान कमी होते किंवा ज्यांना पुन्हा पेरता येते, त्यांची पेरणी करण्यास हरकत नाही. मात्र हरभऱ्यासारख्या पिकासाठी ज्यांना थंडीची आवश्यकता आहे, त्यांनी थांबावे. कारण ढगाळ वातावरण दूर झाल्यावर, २५ ऑक्टोबरनंतर थंडीची स्थिती सुधारून ती चांगली वाढेल आणि पुढील आठवड्यात हवामान निरभ्र राहील.
यानंतरही, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात (५-६ नोव्हेंबर) पुन्हा थोडं वातावरण बिघडेल, परंतु तेव्हा पावसाचे प्रमाण नगण्य असेल असे तोडकर साहेब म्हनाले..










