तूर पिकामध्ये फुलधारणा वाढवण्यासाठी प्रभावी फवारणी नियोजन..लागतील फुलंच फुलं
शेतकरी मित्रांनो, तूर पिकामध्ये फुलधारणेची अवस्था अत्यंत महत्त्वाची असते. या टप्प्यावर योग्य नियोजन केल्यास, फुलांची संख्या वाढवून आणि फुलगळती थांबवून उत्पादनात मोठी वाढ करणे शक्य होते. फुलधारणा सुरू होत आसताना फुलांची संख्या वाढवणे, फुलांची गळ थांबवणे, आणि त्याचबरोबर अळी व बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण ठेवणे यासाठी दोन प्रभावी फवारणी कॉम्बिनेशन्स आम्ही सुचवले आहेत, त्यापैकी कोणतेही एक आपण वापरू शकता….
पहिला फवारणीचा पर्याय:
फुलधारणा वाढवण्यासाठी पहिला जबरदस्त पर्याय म्हणजे फनटॅक प्लस या टॉनिकचा वापर करणे. १५ लिटरच्या पंपासाठी हे टॉनिक १५ मिली घ्यावे. यासोबतच, सूक्ष्म अन्नद्रव्यांची (मायक्रोन्यूट्रिएंट्स) कमतरता भरून काढण्यासाठी चिलेटेड मायक्रोन्यूट्रिंट (कोणतेही) ३० ग्रॅम वापरावे. फुलांच्या अवस्थेत बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी, टिल्ट हे बुरशीनाशक १५ मिली घ्यावे. आणि अळी नियंत्रणासाठी, ईमामेक्टीन हे कीटकनाशक 10 ग्रॅम मिसळून फवारणी करावी. यामुळे फुलधारणा वाढेल, अळी आणि बुरशी नियंत्रणही होईल…
दुसरा (पर्यायी) फवारणीचा पर्याय:
दुसरा पर्याय म्हणून, आपण टाटा बहार (३०-40 मिली) आणि 12.61.00 हे विद्राव्य खत वापर करू शकता. हे देखील मोठ्या प्रमाणात फुलधारणा वाढवते, फुलांची गळ थांबवते आणि नवीन फुटवा वाढवण्यास मदत करते. यासोबत बुरशी नियंत्रणासाठी टिल्ट (१५ मिली) हे बुरशीनाशक वापरावे. आणि अळी नियंत्रणासाठी, बॅराझड/अँम्पलीगो यापैकी कीटकनाशक वापरावे.
या दोन्हीपैकी कोणतेही एक संयोजन उपलब्धतेनुसार निवडून आपण फवारणी करू शकता.जबरदस्त रिझल्ट मिळतील..फुलधारना वाढेल,फुलगळ थांबेल, आळी आणि बुरशी नियंत्रणही होईल…
फवारणीची योग्य वेळ
शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे की, या फवारणीचे जास्तीत जास्त आणि सर्वोत्तम परिणाम मिळवण्यासाठी, तूर पिकामध्ये जेव्हा ५ ते १० टक्के फुलधारणा झालेली असेल, त्याच वेळेस ही फवारणी करणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य वेळी फवारणी केल्यास मोठ्या प्रमाणात फुलधारणा होऊन, अळी आणि बुरशीवर नियंत्रण राहील व फुलांची गळ देखील पुढे होणार नाही.