नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत महाराष्ट्रात मोठ्या पावसाचा किंवा अतिवृष्टीचा कोणताही धोका नसेल. नोव्हेंबर महिन्यातील वातावरणाची प्रणाली काहीशी अस्थिर असली तरी, पावसाचा मोठा प्रभाव जाणवणार नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी कोणत्याही अडथळ्याविना पेरणी, फवारणी आणि इतर शेतीची कामे बिंदास्तपणे सुरू ठेवावीत. विशेषतः, ८ आणि ९ नोव्हेंबरपासून थंडीची तीव्रता वाढेल आणि ती किमान या संपूर्ण महिन्यामध्ये निरंतर राहील. केवळ ७ नोव्हेंबरच्या आसपास दक्षिण महाराष्ट्रातील (सांगली, पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव) भागांमध्ये हवामान खराब होण्याची शक्यता आहे, परंतु त्यामुळे मोठे नुकसान होईल इतका पाऊस अपेक्षित नाही असा अंदाज तोडकर यांनी दिलाय…
डिसेंबर महिन्यामध्ये कोणतीही मोठी प्रणाली विकसित होणार नाही ज्यामुळे नदी-नाले वाहतील इतका पाऊस होईल. या महिन्यात पाऊस हा तुरळक ठिकाणी, विशेषतः कोकण किनारपट्टीवर हलक्या स्वरूपाचा राहील. मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या पावसाची शक्यता नाही. जानेवारी महिन्यात वातावरणातील घटक सक्रिय होऊ शकतात, परंतु संपूर्ण महिना खराब राहील असा अंदाज नाही. मात्र, जानेवारीच्या अखेरीस (सुमारे २६ जानेवारीच्या काळात) ‘लो प्रेशर’ (low pressure) आणि ‘सायक्लोनिक सर्कुलेशन’ चा प्रभाव वाढून पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. (तोडकर हवामान अंदाज)












