पाऊस गेला आता थंडी वाढनार, पण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा पाऊस ; तोडकर यांच्या हवामान अंदाजानुसार, महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागली असून, ८ आणि ९ नोव्हेंबरपासून थंडीची तीव्रता लक्षणीयरीत्या वाढणार आहे. ही येणारी थंडी कड्याक्याची असेल, जी विशेषतः तूर आणि हरभरा या रब्बी पिकांसाठी अत्यंत पोषक ठरणारी आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह सक्रिय झाल्यामुळे, मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात थंडीचे प्रमाण वाढणार आहे. जी थंडी पूर्वी दरवर्षी सकाळच्या वेळी अनुभवायला मिळायची, ती आता या तारखेपासून नियमितपणे जाणवू लागेल, ज्यामुळे रब्बी पिकांची वाढ चांगली होईल.- तोडकर हवामान अंदाज
दरम्यान, मागील काही दिवसांपासून खान्देश (जळगाव, धुळे), विदर्भ आणि छत्रपती संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांमध्ये असलेली कमी-अधिक प्रमाणात ढगाळलेली परिस्थिती आता निवळत आहे. बाष्पयुक्त वारे निष्क्रय झाले असून, थंडीचे प्रवाह सक्रिय झाले आहेत. त्यामुळे, शेतकरी बांधवांना रब्बी पेरणी सुरू करण्यासाठी वातावरण अनुकूल झाले आहे.












