पावसाने घेतला निरोप, आता पुन्हा पाऊस येनार का ; हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांच्या ताज्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातून पावसाळा आता पूर्णपणे संपलेला आहे. शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे की ७ नोव्हेंबरपासून राज्यातून पाऊस पूर्णपणे निघून जाईल आणि पुन्हा मोठा पाऊस येण्याची शक्यता नाही. आज (६ नोव्हेंबर) आणि उद्या (७ नोव्हेंबर) फक्त सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा आणि घाट परिसरांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात; मात्र राज्याच्या इतर भागांमध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही. चांगल्या सूर्यप्रकाशामुळे द्राक्ष, डाळिंब उत्पादक तसेच इतर शेतकऱ्यांची शेतीची कामे आता विनाअडथळा सुरू होणार आहेत.
पाऊस थांबताच राज्यात तीव्र थंडीची लाट सुरू होणार आहे. ७ नोव्हेंबरपासून उत्तर महाराष्ट्र (नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, निफाड) आणि विदर्भातील (अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा) भागांत थंडी जाणवायला सुरुवात होईल. त्यानंतर ८ नोव्हेंबरला ही थंडी मराठवाड्याकडे (संभाजीनगर, बीड, परभणी, जालना) सरकेल, तर ९ व १० नोव्हेंबरपर्यंत ती दक्षिण महाराष्ट्रासह तेलंगणा आणि कर्नाटक राज्यांमध्ये पसरेल.












