पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्यासाठी विलंब होनार.. तारीख पहा
माजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या हप्त्याच्या वितरणाबद्दल रोज नवनवीन बातम्या येत असल्या तरी, शासनाकडून अधिकृत कोणतीही ठोस घोषणा केली जात नव्हती, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा होती. या विलंब होण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे बिहार विधानसभेच्या निवडणुका आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू झालेली आचारसंहिता हे होते. यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर मिळणारा हा हप्ता पुढे ढकलण्यात आला.
१५ नोव्हेंबरपासून प्रक्रिया पुन्हा सुरू
बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा टप्पा १४ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होत आहे. त्यानंतर, १५ नोव्हेंबर २०२५ पासून या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे निर्देश शासनाने प्रत्येक राज्याला दिले आहेत. या प्रक्रियेअंतर्गत, प्रत्येक राज्याला प्रथम पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी करून यादी अद्ययावत करावी लागणार आहे. भौतिक पडताळणीतून कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी आढळणे किंवा इतर कारणांमुळे अपात्र ठरलेल्यांना वगळून, पात्र लाभार्थ्यांची यादी ‘रिक्वेस्ट फॉर फंड ट्रान्सफर’ अर्थात RFT (Request for Fund Transfer) साठी साईन करून केंद्र शासनाकडे पाठवण्याच्या सूचना आहेत.
एकदा राज्य शासनाकडून RFT साईन झाल्यावर, साधारणपणे तीन ते पाच दिवसांनी FTO (Fund Transfer Order) जनरेट केला जातो आणि त्यानंतर निधीची तरतूद करून हप्ता वितरित केला जातो.
हप्ता येण्याची संभाव्य तारीख
सध्याची सर्व प्रक्रिया पाहता, जरी १५ नोव्हेंबरपासून RFT ची प्रक्रिया सुरू झाली, तरी हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यासाठी २५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत किंवा निवडणुकीनंतर सुमारे ८ ते १० दिवसांचा कालावधी लागू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांनी आता RFT साईन होणे आणि FTO जनरेट होणे या अधिकृत अपडेटची वाट पाहणे महत्त्वाचे आहे. जेव्हा याबाबत अधिकृत घोषणा होईल, तेव्हा पुढील हप्त्याच्या घोषणेसंबंधित माहिती तत्काळ उपलब्ध केली जाईल. सध्या तरी, PM किसान योजनेच्या पुढील हप्त्यासाठी शेतकऱ्याला थोडी अधिक प्रतीक्षा करावी लागेल, एवढे निश्चित आहे.