मुसळधार पाऊस झोडपनार, (मोठं संकट) तोडकर साहेबांचा अंदाज
तोडकर हवामान अंदाजानुसार, सध्याची राज्यातील पावसाळी परिस्थिती अतिशय गंभीर राहू शकते. या काळात अनेक ठिकाणी कमी-जास्त प्रमाणात का होईना, पाऊस असणार आहे आणि कोणताही भाग त्यातून सुटणार नाही. मराठवाड्यात तर सूर्यदर्शन होण्याची शक्यता नाही, अशी स्थिती असून, विजांच्या कडकडाटात आणि मोठ्या ढगांच्या फळ्यांसोबत हा पाऊस आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
या काळात काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस पडण्याची व्याप्ती असून, परिस्थिती धोक्याची असल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.
मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील स्थिती
विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ या विभागांमध्ये पावसाची व्याप्ती सर्वाधिक असणार आहे. एका दिवसात संपूर्ण मराठवाडा या पावसाच्या कक्षेत येईल. मराठवाड्यात अहमदनगर, सोलापूर, पंढरपूर, धाराशीव, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, गेवराई, माजलगाव आणि लातूर या पट्ट्यात चांगला पाऊस अपेक्षित आहे.
पश्चिम महाराष्ट्राची व्याप्ती ६० ते ६५% आहे; तरीही कोल्हापूर, सातारा, आणि पुणे जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे.खानदेशातील धुळे, जळगाव, तसेच नाशिक क्षेत्रातील काही भागात भाग बदलत पाऊस पडेल, अशी परिस्थिती आहे.
वातावरणातील बदल
हवामान अंदाजानुसार, हे पर्जन्यमान शेवटचे नसेल, कारण पावसाळी आणि ढगाळलेले वातावरण सध्यातरी कायम राहण्याची शक्यता आहे. सध्याचे हे ढगाळलेले वातावरण निवळल्यानंतर राज्यात थंडीची लाट येऊन वातावरण मोकळं व्हायला सुरुवात होईल. या बदलामुळे दिवसाचे तापमानही बऱ्यापैकी कमी होईल आणि थंडी जाणवू लागेल, असा अंदाज आहे.