राज्यात चांगले सुर्यदर्शन आणि जोराची थंडी कधीपासून, पहा गजानन जाधव यांचा अंदाज
गजानन जाधव यांचा हवामान अंदाज ; पुढील काही दिवसांमध्ये विशेषता ५ नोव्हेंबरपर्यंत, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत तुरळक ठिकाणी आभाळी हवामान आणि विखुरलेल्या स्वरूपाचा हलका व वादळी पाऊस अपेक्षित आहे. मात्र, हा पाऊस सार्वत्रिक किंवा मोठ्या प्रमाणात नसेल. या दरम्यान थंडी सामान्य राहून हवामान उष्ण राहील, ज्यामुळे तापमानात फारशी घट जाणवणार नाही.
६ नोव्हेंबर, गुरुवारपासून, राज्यात संपूर्णपणे कोरडे हवामान राहील. शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत दिलासादायक बाब असून, संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात पुन्हा पावसाचा कोणताही अंदाज सध्या तरी नाही अशी माहिती गजानन जाधव यांनी दिली आहे.
थंडीत वाढ होनार
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हवामान कोरडे झाल्यानंतर ६ आणि ७ नोव्हेंबरपासून थंडीत लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज आहे. सुरुवातीला किमान तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. त्यानंतर तापमानात आणखी घट होऊन विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात तापमान १० ते १५ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. विशेषतः पूर्व विदर्भ (वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली) येथे तापमान त्याहूनही कमी राहू शकते. या बदलामुळे खऱ्या अर्थाने चांगल्या थंडीच्या हंगामाला सुरुवात होईल, असे संकेत गजानन जाधव यांनी दिले आहेत.
रबी हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांनी शेत तयार करणे, पेरण्या करणे आणि तुरीवरील फवारण्या नियमित वेळेनुसार सुरू कराव्यात. हरभरा पेरणीची घाई करावी, मात्र यावर्षी जमिनीत भरपूर ओलावा असल्यामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हरभऱ्याच्या बियाण्याला बीजप्रक्रिया करणे आणि पेरणीच्या वेळी अर्धा किलो ट्रायकोडर्मा जमिनीत मिसळून टाकणे अत्यंत आवश्यक आहे.
तसेच, तुरीवर कळी अवस्थेत आळ्यांचे नियंत्रण आणि फुलांची संख्या वाढवण्यासाठी इमान किंवा मस्केट, झेप, 12:61:0 आणि झिंक डीटीएचा फवारा घेण्याचा महत्त्वाचा कृषी सल्ला देण्यात आला आहे….