वातावरणात मोठा बदल, थंडीला होनार सुरुवात..नोव्हेंबरमध्येही पाऊस येनार – तोडकर हवामान अंदाज
तोडकर हवामान अंदाज ; राज्यात सध्या ढगाळ हवामानाची स्थिती कायम राहणार आहे, परंतु शेतकऱ्यांसाठी हा काळ पेरणीसाठी विना अडथळा ठरेल असा अंदाज आहे. वातावरण खराब असले तरी मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे. पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, सोलापूर, सांगली, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, हिंगोली आणि नांदेडसह काही भागांमध्ये स्थानिक वातावरणामुळे तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
हा पाऊस फार मोठा नसणार आहे; त्यामुळे शेतकरी बिनधास्तपणे कापूस वेचणी करू शकतात. ज्या शेतकऱ्यांच्या शेतीत योग्य वापसा झालेला आहे, त्यांनी काळजी न करता पेरणीची कामे सुरू करावीत. ज्यांची जमीन खडकाळ आहे, ते देखील पेरणीसाठी तयार राहू शकतात.
या काळात वातावरणात मोठा बदल दिसून येणार असून थंडीत चांगली वाढ होण्यास सुरुवात होईल. सुरुवातीला सकाळ, संध्याकाळ आणि मध्यरात्रीच्या वेळी थंडीचा प्रभाव जाणवेल. दिवसाच्या वेळी, विशेषतः झाडाखाली बसल्यावर किंवा घरी परतताना थंड वाऱ्याची झुळूक लागल्यास तापमान कमी झाल्याचे स्पष्ट संकेत मिळतील.
हळूहळू, ही थंडी इतकी वाढेल की दिवसा दुपारच्या वेळी सुद्धा थंड हवामान जाणवू लागेल. ही थंडी वाढल्यावर, जेव्हा दिवसभरही थंडीचा अनुभव येईल, तेव्हा गहू आणि हरभरा यांसारख्या थंडीवर आधारित पिकांच्या पेरणीसाठी सर्वोत्तम काळ असेल. (तोडकर हवामान अंदाज)
या काळानंतरही, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वादळी वाऱ्यांची निर्मिती होत राहील, ज्यामुळे महिन्याच्या अखेरीस तसेच पुढील महिन्यातही हवामान बिघडण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील वाऱ्यांच्या विकासामुळे महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण आणखी वाढेल असा अंदाज तोडकर यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, तुरीच्या पिकासाठी सध्याचे ‘खवल्या खवल्याचे आभाळ’ म्हणजे हलके ढगाळ वातावरण हानिकारक ठरू शकते. अशा वातावरणामुळे तुरीच्या गाठी गळतात. तुरीच्या शेंगा पूर्ण भरल्या जाईपर्यंत खानदेश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये हे ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.