हमीभाव खरेदी ; हमीभावाने सोयाबीन विकन्यासाठी नोंदणी प्रक्रिया, कागदपत्रे आणि अटी पहा ; खरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत राज्यातील सोयाबीन, मूग, उडीद आणि धान या प्रमुख पिकांची शासनाच्या हमीभावाने खरेदी करण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्र शासनाच्या मंजुरीनंतर, राज्यासाठी मोठा खरेदी कोटा निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये १८ लाख ५० हजार ७०० मेट्रिक टन सोयाबीन, ३३ हजार मेट्रिक टन मूग, आणि ३ लाख २५ हजार ६८० मेट्रिक टन उडदाची खरेदी केली जाईल.
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सोयाबीनचा हमीभाव प्रति क्विंटल ५,३२८ रुपये निश्चित करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत शेतमाल विकायचा असल्यास, शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी करणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांची हमीभाव खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया ३० ऑक्टोबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत केली जाणार आहे. ही नोंदणी ई-समृद्धी पोर्टलवर किंवा शासनाने मान्यता दिलेल्या जवळच्या हमीभाव खरेदी केंद्रांवर जाऊन करता येते. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, प्रत्यक्ष शेतमाल खरेदीची प्रक्रिया १५ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होणार आहे. ही खरेदी पुढील ९० दिवसांसाठी, म्हणजेच साधारणपणे १२ ते १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत, हमीभाव केंद्रांवर केली जाईल. केंद्रांच्या सूचनांनुसार आणि केंद्र शासनाच्या निकषांनुसार (उदा. आर्द्रता) ही खरेदी प्रक्रिया पार पडेल.
सोयाबीन, मूग आणि उडीद या पिकांच्या नोंदणीसाठी फार्मर आयडी (Farmer ID) असणे अनिवार्य आहे, कारण या आयडीद्वारे शेतकऱ्याची जमीन आणि ई-पीक पाहणीची माहिती उपलब्ध होते. सध्या नोंदणीसाठी शेतकऱ्याचा आधार कार्ड, बँकेचे अद्ययावत पासबुक आणि चालू हंगामातील ७/१२ उतारा ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
जर फार्मर आयडी उपलब्ध नसेल, तर ७/१२, आधार कार्ड आणि बँक पासबुक यासह ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे शक्य आहे. दरम्यान, योग्य शेतकऱ्यांचाच माल खरेदी व्हावा यासाठी, मूग, उडीद आणि सोयाबीनच्या खरेदीतही बायोमेट्रिक नोंदणी लागू करण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे.
धान (Paddy) खरेदीची नोंदणी प्रक्रिया ३१ नोव्हेंबर २०२५ पर्यंत सुरू असून, यामध्ये बोगस नोंदणी आणि व्यापाऱ्यांकडून होणारे गैरप्रकार थांबवण्यासाठी कठोर निकष लागू करण्यात आले आहेत. धान खरेदीसाठी शेतकऱ्यांची बायोमेट्रिक उपस्थिती आणि लाईव्ह फोटो अनिवार्य करण्यात आला आहे, ज्यामुळे शेतकऱ्याला स्वतः उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
धान नोंदणीसाठी चालू हंगामाचा पीक पेरा, सातबारा, नमुना ८, अद्ययावत बँक पासबुक/रद्द केलेला चेक, मोबाईल नंबर आणि आधार कार्ड ही कागदपत्रे लागतील. तालुक्याच्या जवळच्या पणन महासंघाच्या ‘अ’ वर्ग किंवा ‘ब’ वर्ग सभासद संस्था/खरेदी केंद्रांवर ही नोंदणी करता येईल.
सोयाबीन हमीभाव नोंदणी ; अशी करा मोबाइलवरून..अशी आहे प्रक्रिया – https://srtcollegedhamri.com/सोयाबीन-हमीभाव-नोंदणी/
सोयाबीन हमीभाव नोंदणी ; अशी करा मोबाइलवरून..अशी आहे प्रक्रिया