हरभरा खत व्यवस्थापन गजानन जाधव यांचे ; हरभरा पिकासाठी खत व्यवस्थापन करताना जमिनीच्या प्रकारानुसार खताची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण एकाच खताचा ग्रेड सर्व प्रकारच्या जमिनीसाठी योग्य नसतो. हरभऱ्याच्या मुळांवर नत्र स्थिर करणाऱ्या गाठी (Nodules) असतात. हे गाठी हवेतील नत्र शोषून पिकाला पुरवतात. त्यामुळे इतर पिकांप्रमाणे हरभऱ्याला बाहेरील नत्राची (युरियाची) गरज फार कमी असते. परिणामी, हरभऱ्याच्या पेरणीसोबत युरिया देण्याची आवश्यकता नसते. खताची निवड करताना आपल्या जमिनीतील नत्राचे प्रमाण किती आहे हे पाहून त्यानुसार निर्णय घेणे अधिक फायदेशीर ठरते.
भारी आणि मध्यम जमिनीसाठी खत नियोजन
ज्या जमिनी एकदम भारी आहेत आणि जिथे हरभऱ्याची वाढ दरवर्षी खूप जास्त होते, अशा जमिनीत पिकाला नत्र देण्याची गरज नसते. त्यामुळे अशा जमिनीसाठी फक्त सिंगल सुपर फॉस्फेट (SSP) चा वापर करावा. पेरणीपूर्वी किंवा पेरणीसोबत २ ते ३ बॅग सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर पुरेसा ठरतो.
याउलट, मध्यम प्रकारच्या जमिनीत जिथे हरभऱ्याची वाढ मध्यम असते, अशा ठिकाणी समतोल वाढीसाठी मिश्र खतांची शिफारस केली जाते. यासाठी डीएपी (DAP), किंवा १२:३२:१६, १४:३५:१४, किंवा १०:२६:२६ यांसारख्या खतांचा वापर करता येतो अशी माहिती गजानन जाधव यांनी दिली आहे.
मध्यम हलक्या जमिनीसाठी हरबरा खत व्यवस्थापन
मध्यम हलक्या जमिनीत जिथे हरभऱ्याची वाढ कमी होते आणि नत्राची कमतरता जाणवते, अशा जमिनीसाठी तुलनेने जास्त प्रमाणात स्फुरद (Phosphorus) आणि नत्र (Nitrogen) असलेले खत वापरावे. यासाठी २०:२०:०:१३ किंवा २४:२४:०:८ अधिक पोटॅश (Potash) असलेले खत द्यावे. या खतांमुळे पिकाला आवश्यक पोषण मिळते आणि वाढ संतुलित राहते.
जिवाणू खताचा वापर
या कोणत्याही रासायनिक खतासोबत तुम्ही जिवाणू खताचा (Bio-fertilizer) वापर करू शकता. एनपीके बूस्ट टीx (NPK Boost Tx) हे जिवाणू खत अर्धा किलो प्रति एकर या प्रमाणात वापरल्यास खताची उपयुक्तता अधिक वाढते आणि उत्पादन वाढण्यास मदत होते असेही जाधव यांनी सांगितले..
हि माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नक्की शेयर करा…🙏