रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; पुढील 3-4 दिवस जोरदार पाऊस.. या जिल्ह्यांना अलर्ट
डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार, बुधवार, २२ ऑक्टोबरपासून ते शनिवार, २५ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात विविध भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
डॉ. रामचंद्र साबळे हवामान अंदाज बुधवार, २२ ते शनिवार, २५ ऑक्टोबर)
या चार दिवसांत राज्याच्या पश्चिम भागात हवेच्या दाबात घट होणार आहे. बुधवार आणि गुरुवार, २२ व २३ ऑक्टोबर रोजी हवेचा दाब १००८ हेप्टा पास्कल इतका असेल, तर शुक्रवार आणि शनिवार, २४ व २५ ऑक्टोबर रोजी तो आणखी कमी होऊन १००६ हेप्टा पास्कल इतका राहील. हवेचा दाब कमी झाल्यामुळे संबंधित क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात ढग जमा होण्याची आणि पावसाची शक्यता वाढेल.
याच काळात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर देखील कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन चक्राकार वारे वाहतील, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात ढग तयार होतील. या बदलांमुळे कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या विभागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पावसाला कारणीभूत घटक
या बदलांमागे आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही प्रमुख कारणे आहेत. बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागरातील पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३०°C ते ३१°C पर्यंत वाढले आहे. या वाढलेल्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढतो, परिणामी ढगांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि ते महाराष्ट्राच्या दिशेने येत आहेत. याव्यतिरिक्त, प्रशांत महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान १४°C ते २१°C पर्यंत थंड झाले असून, यालाच ला निना (La Niña) चा परिणाम म्हणतात. या प्रभावामुळे हवेचा दाब वाढला असून, इकडचे वारे तिकडे जाऊ शकत नाहीत, ज्यामुळे महाराष्ट्राच्या भागावर दक्षिण, पूर्व आणि पश्चिमेकडून मोठ्या प्रमाणात ढग येत आहेत. ला निना (La Niña) चा हा प्रभाव ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात देखील कायम राहण्याची शक्यता आहे.
विभागनिहाय पावसाचा अंदाज ; रामचंद्र साबळे
कोकण:
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी: काही दिवशी १५ मिलिमीटरपर्यंत पाऊस अपेक्षित.
रायगड, ठाणे आणि पालघर: काही दिवशी ६ मिलिमीटर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस.
उत्तर महाराष्ट्र:
नाशिक: काही दिवशी ६ ते ७ मिलिमीटर पावसाची शक्यता.
धुळे, नंदुरबार व जळगाव: काही दिवशी ३ मिलिमीटर पावसाची शक्यता.
मराठवाडा (सर्व जिल्हे): ३ ते २४ मिलिमीटर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज.
विदर्भ (सर्व जिल्हे): २ ते १२ मिलिमीटर हलक्या स्वरूपाचा पाऊस.
दक्षिण पश्चिम महाराष्ट्र (सर्व जिल्हे): ५ ते १४ मिलिमीटर हलक्या स्वरूपात पाऊस.