Pm Kisnan चा पुढील हप्ता कधी येणार? या तारखेला होनार जमा
मित्रहो, केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता लवकरच वितरित होण्याची प्रतीक्षा राज्यातील शेतकरी करत आहेत. राज्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना या आर्थिक मदतीची मोठी अपेक्षा आहे.
विशेष म्हणजे, केंद्र शासनाने यापूर्वीच हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि जम्मू-काश्मीर या पूरग्रस्त राज्यांमधील सुमारे ३३ लाख शेतकऱ्यांना आगाऊ स्वरूपात पीएम किसानचा हप्ता वितरित केला आहे. या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे (सुमारे ९२ ते ९३ लाख) झालेले नुकसान कित्येक पटीने जास्त आहे, तरीही महाराष्ट्राला अद्याप ही मदत मिळाली नाही, ही एक मोठी थट्टाच आहे.
राज्यात दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असतानाही, पीएम किसानचा हप्ता वितरित करण्याबाबत कोणतीही स्पष्ट तारीख किंवा संकेत केंद्र सरकारकडून मिळालेले नाहीत. काही वरिष्ठ मंत्र्यांनी पूरग्रस्त राज्यांना हप्ता वितरित करणे ही प्राथमिकता असल्याचे सांगितले असले तरी, बिहारमधील निवडणुका आणि आचारसंहिता यामुळे हप्ता वितरणात अडथळे येत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वर्तमानपत्रांमध्ये ‘या आठवड्यात येणार’, ‘पुढील आठवड्यात येणार’ अशा बातम्या येत असल्या तरी, सद्यस्थितीत, ९०% पेक्षा जास्त शक्यता अशी आहे की, हा हप्ता आता १४ नोव्हेंबरनंतरच (निवडणुका संपल्यानंतर) वितरित केला जाईल.
दरम्यान, केंद्र सरकारने पीएम किसान योजनेतील लाभार्थींची मोठ्या प्रमाणावर तपासणी सुरू केली आहे. देशभरातील सुमारे २९ लाख ३६ हजार संशयास्पद लाभार्थ्यांची पडताळणी केली जात आहे. या तपासणीत एकाच कुटुंबातील पती-पत्नी किंवा १८ वर्षांवरील अविवाहित व्यक्ती लाभ घेत असल्याचे दिसून येत आहे. पीएम किसान योजनेनुसार ‘कुटुंब’ म्हणजे पती, पत्नी आणि १८ वर्षांखालील अविवाहित मूल अशी मर्यादित व्याख्या आहे.
या व्याख्येनुसार, एका कुटुंबात केवळ एकाच व्यक्तीला लाभ मिळू शकतो. त्यामुळे, या संशयास्पद लाभार्थ्यांना आता फिजिकल व्हेरिफिकेशन, बँक खात्याला आधार लिंकिंग आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांचा लाभ बंद होऊ शकतो.