चक्रीवादळामुळे पावसाची व्याप्ती वाढनार, या जिल्ह्यात जोरदार… तोडकर हवामान अंदाज
तोडकर हवामान अंदाज : चक्रीवादळामुळे पुढील काही दिवसांत पावसाची व्याप्ती ८०% पर्यंत वाढणार आहे. २४ ऑक्टोबरपासून हवामान पूर्णपणे बिघडणार असून, पहाटेपासूनच अनेक भागांमध्ये पावसाची ॲक्टिव्हिटी दिसणार आहे. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक असेल. सोलापूर, सांगली, पुणे, बारामती शहर, अहिल्यानगरचा काही भाग, लातूर, परभणी आणि जालन्यामध्ये पहाटेच्या सुमारास पाऊस होण्याची शक्यता आहे. सकाळचा पाऊस सर्वदूर नसला तरी, अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी दिसतील.
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये या काळात जोरदार पावसाची शक्यता आहे. यामध्ये बीड, सांगली, सोलापूर, पुणे या भागांत काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव (उस्मानाबाद) आणि जालन्याच्या अनेक भागांनाही याचा तडाखा बसेल.
या पावसामुळे कपाशी आणि इतर पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना शेतीची कामे थांबवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नाशिक या क्षेत्राच्या काही भागांमध्येही सकाळपासून पाऊस आणि ढगाळ वातावरण राहणार आहे. (तोडकर हवामान अंदाज)
२५ आणि २६ ऑक्टोबर रोजी पावसाची व्याप्ती वाढून हा जोर प्रामुख्याने विदर्भ आणि खान्देशाकडे सरकणार आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, जळगाव, नंदुरबारसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांसाठी २५ तारीख महत्त्वाची आहे. विदर्भ आणि खान्देशामध्ये ८०% पर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या तारखांना मराठवाड्यातही चांगला पाऊस अपेक्षित आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अनेक भागांमध्ये पावसाळ्याप्रमाणेच परिस्थिती निर्माण होईल आणि सुमारे ७०% भागांना या पावसाचा मोठा फटका बसू शकतो असा अंदाज तोडकर यांनी दिलाय…
एकंदरीत हा पाऊस सुमारे पाच ते सहा दिवस राहण्याचा अंदाज आहे आणि नोव्हेंबर महिन्यातही ला-निना (La-Nina) च्या स्थितीमुळे वातावरणात गारवा कमी होऊन पावसाळी स्वरूप राहू शकते. २६ किंवा २७ ऑक्टोबरनंतर दक्षिण महाराष्ट्रातील (सांगली, कोल्हापूर, सोलापूर) पावसाचा जोर काहीसा ओसरू शकतो, आणि तो जोर उत्तरेकडील उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भ आणि पूर्व मराठवाड्याकडे वळेल.
मराठवाडा आणि विदर्भात हा पाऊस दीर्घकाळ टिकून राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी विशेषतः नदीकाठची जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत आणि कापणी केलेल्या पिकांसाठी ताडपत्रीची व्यवस्था करून ठेवावी, असे आवाहन तोडकर यांच्या कडून करण्यात आले आहे.