आठवडाभर महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता !
शनिवार दि. २५ ऑक्टोबर २०२५, आजपासुन आठवडाभर महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता!’
आजपासुन आठवडाभर म्हणजे शनिवार दि. १ नोव्हेंबर पर्यन्त मुंबई सह संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र खान्देश विदर्भात मध्यम पावसाची शक्यता जाणवते.
विशेषतः धुळे नंदुरबार, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, धाराशिव, लातूर, अकोला, अमरावती, नागपूर, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर ह्या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
कश्यामुळे ह्या पावसाची शक्यता? हे आहे कारण
i)आज पूर्व मध्य अरबी समुद्रात, मुंबईच्या नैरूक्त ला ७०० किमी. अंतरावर कमी दाब क्षेत्राचे तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर झाल्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात ह्या मध्यम पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. हे कमी दाब क्षेत्र येत्या पाच दिवसात देशाच्या पश्चिम किनारपट्टीपासून दूर पश्चिमेकडे ओमान-येमेन देशकडे कडे मार्गस्थ होण्याची शक्यता जाणवते.
ii) आग्नेय बं उपसागारातील कमी दाब क्षेत्राचे उद्या मध्य बं. उपसागारात मार्गक्रमण होवून तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर.. व २८ तारखेला तारखेलाच तीव्र चक्रीवादळात रूपांतर होवून आंध्र किनार पट्टीवरील मछलीपटणम व कलिंगपटणम ह्या शहरांच्या मध्यावरील काकींनाडा शहराच्या आसपास धडकण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे दक्षिण भारताबरोबर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
इतकेच!…माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.