चक्रीवादळ महाराष्ट्रात घुसनार, या जिल्ह्यात अतीव्रुष्टी ; तोडकर हवामान अंदाज
राज्यात सध्या बंगालच्या उपसागरातील तसेच अरबी समुद्रातील हवामान प्रणालीमुळे दोन्ही बाजूंनी पावसाची कोंडी झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम भागांसह पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, तसेच बीड आणि धाराशिवच्या काही भागांना आजही (२६ ऑक्टोबर) मेघगर्जना आणि मुसळधार पावसाचा इशारा आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये रात्रीच्या वेळी दमदार पाऊस अपेक्षित आहे. दिवसा जरी ऊन असले तरी संध्याकाळकडे ढग जमा होऊन काही ठिकाणी जोरदार सरी कोसळतील. विदर्भातही नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि गोंदियामध्ये भाग बदलत पद्धतीने पाऊस सुरूच राहणार आहे.
२७ ऑक्टोबर रोजी मराठवाड्यात पावसाचा जोर थोडा कमी होईल, मात्र धुळे आणि खान्देश पट्ट्यात पाऊस कायम राहील. यानंतर, २८ आणि २९ ऑक्टोबरला बंगालच्या उपसागरात तयार झालेले चक्रीवादळ तेलंगणा मार्गे महाराष्ट्रात प्रवेश करण्याची शक्यता आहे. यामुळे मराठवाड्यातील लातूर, नांदेडसह अनेक भागांमध्ये पावसाची पुन्हा जोरदार हजेरी लागेल. तसेच, विदर्भात अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यांना २८ आणि २९ ऑक्टोबर दरम्यान दमदार पाऊस अपेक्षित आहे.
३० ऑक्टोबरनंतर मराठवाडा आणि विदर्भातील हवामान कामे आटोपण्यासाठी अनुकूल होण्याची शक्यता आहे. मात्र, ३१ ऑक्टोबरला देखील धुळे-जळगाव आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात तुरळक पाऊस पडू शकतो. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात (४-५ नोव्हेंबर) बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची चिन्हे आहेत, ज्यामुळे २ ते ३ नोव्हेंबर दरम्यान छत्रपती संभाजीनगर आणि इतर काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्याची ही अस्थिर हवामानाची स्थिती ‘ला-निना’ प्रभावामुळे आहे, जो पॅसिफिक महासागरात अजूनही सक्रिय आहे. यामुळे समुद्रातील वाढत्या तापमानामुळे एका पाठोपाठ एक अशी वादळे तयार होत आहेत. हा प्रभाव पूर्णपणे कमी झाल्याशिवाय राज्यात नोव्हेंबर महिन्यातही चांगल्या प्रकारे थंडीचे आगमन होण्याची शक्यता कमी आहे, कारण पावसाची ही मालिका खंडित स्वरूपात संपूर्ण महिनाभर सुरू राहू शकते.