नोव्हेंबरमध्ये पुन्हा चक्रीवादळाचा तडाखा, पहा तोडकर साहेबांचा अंदाज
तोडकर हवामान अंदाजानुसार,२७ ऑक्टोबर रोजी पावसाचे आगमन पुन्हा एकदा नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात होणार आहे. सोलापूर, पुणे भागावर पावसाचे रडार कायम राहील. मराठवाड्यात मात्र ‘मोंथा’ नावाच्या चक्रीवादळामुळे वातावरणाची मोठी व्याप्ती नसून फक्त तुरळक ठिकाणी स्थानिक पाऊस पडेल. नंदुरबार, शहादा, धुळे, जळगाव आणि कर्नाटकच्या हुबळीतही २७ ला पावसाची हजेरी असेल असा अंदाज तोडकर यांनी दिलाय…
२८ आणि २९ ऑक्टोबरला पावसाचा जोर वाढणार
बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा (लोप्रेशरचा) प्रभाव २८ ऑक्टोबरपासून मराठवाड्यामध्ये पुन्हा वाढणार आहे. यामुळे २८ आणि २९ ऑक्टोबर या दोन दिवशी नांदेड, नागपूर, पूर्व विदर्भातील सर्व जिल्हे, यवतमाळ, हिंगोली, अकोला, वाशिम या भागांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता आहे. विशेषतः चंद्रपूर जिल्ह्याला २८ आणि २९ ऑक्टोबरला जास्त पावसाचा जोर असणार आहे.
२९ ऑक्टोबर हा दिवस २५ ऑक्टोबरपेक्षाही मोठा असेल, ज्यात अकोला आणि अमरावतीच्या बऱ्याच भागांमध्ये धुवाधार पावसाची नोंद होऊ शकते. छत्रपती संभाजीनगर, जळगाव, खामगाव, बुलढाणा, मलकापूर, नाशिक, पुणे आणि परभणी, जालना, बीड जिल्ह्यांमध्येही २९ तारखेला पाऊस सक्रिय राहील. या काळात वाऱ्यासह थंडावा आणि गारवटपणा जाणवेल. ,(तोडकर हवामान अंदाज)
नोव्हेंबरमध्येही नवीन हवामान प्रणाली
ऑक्टोबरच्या अखेरीस, ३० आणि ३१ ऑक्टोबरला परत एकदा नंदुरबार, शहादा, धुळे, जळगाव या खान्देश भागात जोरदार पावसाची परिस्थिती पाहायला मिळू शकते. याच काळात गुजरातमध्येही मोठे संकट येण्याची शक्यता वर्तवली आहे.
यानंतर, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, म्हणजेच १ किंवा २ नोव्हेंबरच्या आसपास, बंगालच्या उपसागरामध्ये परत एकदा चक्रीय स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या स्थितीमुळे अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पामुळे छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि कोकण किनारपट्टीतील कोल्हापूरसारख्या भागांमध्ये स्थानिक वातावरणाचा जोरदार पाऊस होईल, ज्यामुळे खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा पावसाळी वातावरण तयार होऊ शकते अशी माहिती तोडकर यांनी दिली आहे.