पाऊस घेनार विश्रांती, पहा कधीपासून… पंजाब डख यांचा नवीन अंदाज जाहीर
राज्यात पाऊसाचा धुमाकूळ आणखी काही दिवस सुरू राहणार असल्याचे हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी सांगितले आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीत तयार झालेल्या दोन कमी दाबाच्या पट्ट्यांचे रूपांतर चक्रीवादळात झाले आहे. या दोन चक्रीवादळांच्या बाष्प खेचण्याच्या प्रक्रियेमुळे महाराष्ट्रात हा पाऊस पडत आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी या अंदाजानुसार आपल्या पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन डख यांनी केले आहे.
पाऊस आनखी किती दिवस…
राज्यामध्ये आता केवळ तीन दिवस चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. 29 ऑक्टोबर, 30 आणि 31 ऑक्टोबर या तीन दिवसांदरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात आणि जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे. हा पाऊस ‘भाग बदलत’ स्वरूपाचा असेल, म्हणजे काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी शेतातून पाणी बाहेर पडेल इतका जोरदार पाऊस पडेल.
नांदेड, हिंगोली, यवतमाळ, लातूर, परभणी, बीड, संभाजीनगर, पुणे, कोकणपट्टी, मुंबई, नाशिकसह संपूर्ण राज्यातील जिल्ह्यांमध्ये या कालावधीत पाऊस अपेक्षित आहे. रात्रीच्या वेळी काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पाऊस विश्रांती कधी घेनार ?
राज्यात पाऊस लवकरंच विश्रांती घेणार असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ‘वरुण राजा’ (पाऊस) निघून जाणार आहे. 30 ऑक्टोबरनंतर पाऊसाचे प्रमाण कमी होईल, तर 31 ऑक्टोबरपर्यंत राज्यात कमी-अधिक पाऊस राहणार आहे. 1 नोव्हेंबरपासून राज्यामध्ये धुई, धुके किंवा धुरळे (ठिकठिकाणी वेगवेगळे नाव) यायला सुरुवात होईल.
पाऊस निघून गेल्यावर लगेचच थंडीला सुरुवात होणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडी वाढेल. 2, 3, 4 आणि 5 नोव्हेंबरनंतर थंडीत वाढ होत जाईल आणि 7 नोव्हेंबरला राज्यात चांगली थंडी जाणवणार आहे.