पाऊस घेनार विश्रांती, पण नोव्हेंबरच्या या तारखेपासून पुन्हा पाऊस… तोडकर हवामान अंदाज
तोडकर हवामान अंदाज – अरबी समुद्रातील बाष्प आणि कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव महाराष्ट्र राज्यात अजूनही जाणवत आहे. मराठवाडा बहुतांशी मोकळा राहील, तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि तुरळक सरी पडण्याची शक्यता आहे. हिंगोली, नांदेड आणि विदर्भाच्या काही भागांत सकाळच्या वेळेस पावसाचा हलकासा झटका जाणवू शकतो.
त्याचप्रमाणे, नाशिक, सातारा, सांगली, पुणे, जळगाव आणि बुलढाणा या क्षेत्रांमध्ये आभाळ येऊन हलके फटकारे पडतील. मात्र, पावसाची तीव्रता कमी असल्यामुळे बहुतांश भागांत शेतीची कामे चालू ठेवता येतील, केवळ २०% कामांमध्ये व्यत्यय येण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, सोलापूर, अहमदनगर आणि सांगली येथे सुमारे २० ते २५ टक्के व्याप्तीचा पाऊस होऊ शकतो, तर खान्देश आणि विदर्भातील पावसाची व्याप्ती कमी होण्याची चिन्हे आहेत.
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात थंडीचे आगमन होणे, हा या अंदाजातील सर्वात महत्त्वाचा बदल आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स (WD) वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडी सुरू होईल. नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या दिवसांपासून हे थंड वारे पूर्ण वेगाने महाराष्ट्राकडे पोहोचतील आणि यामुळे धुई आणि धुक्याचे वातावरण जवळपास ५ ते ६ दिवस निरंतर राहील. हे थंडीचे वारे साधारणत: नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत (६-७ तारखेपासून ते १० तारखेपर्यंत) संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव दर्शवतील.
पाऊस घेनार विश्रांती..
शेती कामांसाठी दिलासा देणारी बाब म्हणजे, कापूस वेचणीसारख्या कामांसाठी योग्य वेळ मिळणार आहे. अनेक भागांमध्ये पाऊस पूर्णपणे थांबलेला नसला तरी, त्याची व्याप्ती कमी आहे, ज्यामुळे कामांना गती मिळेल. मात्र, नोव्हेंबर महिन्यात पाऊस पूर्णपणे जाणार नाही.
महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वातावरण खराब राहीलच, पण नोव्हेंबरच्या उत्तरार्धात (साधारणतः १९ ते २१ तारखेदरम्यान) वातावरणात पुन्हा बदल होऊन पावसाची दुसरी फेरी राज्यात परत येण्याची शक्यता आहे. सध्या तरी या पावसाची व्याप्ती सामान्य (२०-२५%) राहील, परंतु ती वाढू देखील शकते. बंगालच्या उपसागरात तयार होणारे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकणार असल्याने महाराष्ट्रावर त्याचा मोठा धोका नाही अशी माहिती तोडकर यांनी दिली आहे.