लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता खात्यात जमा होणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. ऑक्टोबर महिन्याच्या थकीत हप्त्याचे वितरण करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्य शासनाने, २९ ऑक्टोबर २०२५ रोजी, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी आवश्यक निधी मंजूर केला आहे.
त्यामुळे आता पुढील ४ ते ५ दिवसांत हा हप्ता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा (क्रेडिट) केला जाईल. ज्या लाडक्या बहिणींना नियमितपणे हप्ते मिळत आहेत, अशा महिला लाभार्थ्यांचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांचे अर्ज पडताळणीमध्ये आलेले आहेत. ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते जून महिन्यापासून बंद होते, अशा महिलांसाठीही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. ज्या लाभार्थ्यांची पडताळणी आणि ‘केवायसी’ (KYC) प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यांचे जूनपासूनचे सर्व थकीत हप्ते त्यांच्या खात्यात जमा केले जात आहेत. म्हणजेच, तुमचा हप्ता थांबला असेल आणि तुम्ही सर्व औपचारिकता पूर्ण केल्या असतील, तर तुम्हाला थकीत असलेली सर्व रक्कम आता मिळू शकेल.
मात्र, ज्या लाडक्या बहिणींची केवायसी (KYC) झालेली नाही किंवा त्यांचे नाव अद्याप पडताळणी प्रक्रियेत आहे, त्यांना मात्र या हप्त्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. विशेषतः, ज्यांचे अर्ज पडताळणीमध्ये आहेत परंतु केवायसी झालेली नाही, अशा महिलांना हप्त्याचे वितरण केले जाणार नाही. त्यामुळे, ज्या पात्र महिला लाभार्थ्यांनी अद्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी ती त्वरित पूर्ण करून घ्यावी. केवायसी करण्याची शेवटची तारीख १८ नोव्हेंबर २०२५ आहे.