राज्यातला पाऊस कधी थांबनार ; पंजाब डख यांच्या हवामान अंदाजानुसार राज्यात लवकरच पावसाचा हंगाम पूर्णपणे थांबून थंडीला सुरुवात होणार आहे. सध्याच्या (3 नोव्हेंबर 2025 च्या) अंदाजानुसार, सात तारखेपासून राज्यातून पाऊस कायमचा माघार घेणार आहे आणि पावसाळा अधिकृतपणे संपेल. ही सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण यानंतर राज्यात पाऊस येण्याची शक्यता जवळजवळ नाही. या घटनेनंतर थंडीला सुरुवात होईल. सुरुवातीला जाणवणारी थंडी हळूहळू वाढत जाईल, आणि दहा ते अकरा तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना स्वेटर घालण्याची वेळ येईल, एवढी थंडी वाढणार आहे.
राज्यात सध्या, म्हणजे तीन, चार आणि पाच नोव्हेंबर या दरम्यान, काही जिल्ह्यांमध्ये केवळ तुरळक आणि विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस सर्वदूर नसेल, तर तो फक्त भाग बदलत पडेल. विखुरलेल्या पावसाचा प्रभाव प्रामुख्याने यवतमाळ, हिंगोली, वाशिम, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, अहमदनगर, जालना, सोलापूर, सांगली, आणि सातारा या पट्ट्यात जाणवेल. त्यामुळे, खूप मोठ्या पावसाची अपेक्षा न ठेवता, शेतकऱ्यांनी आपल्या कामाचे नियोजन करावे.












