आजपासून ऑक्टोबर चा हप्ता येणार खात्यात, लाडकी बहीण योजना ; लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आजपासून ऑक्टोबरचा हप्ता मिळणार आहे.महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत घोषणा केली आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यात आजपासून १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात होईल.
ऑक्टोबर महिना संपला तरीही हप्त्याबाबत कोणतीही अपडेट समोर आली नव्हती. त्यानंतर आत हे पैसे लवकरच महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे.
आदिती तटकरे काय म्हणाल्या? (Aditi Tatkare Annoucement of Ladki Bahin Yojana October Installment)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे. महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरचा आधी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती !, असं आदिती तटकरेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पुढच्या दोन तीन दिवसात सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा केले जातील, असं सांगितलं आहे. आधार आणि बँक अकाउंट लिंक असलेल्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत.
केवायसी करण्याचे आवाहन (Ladki Bahin Yojana KYC Mandatory)
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करण्याचे आवाहन आदिती तटकरेंनी केले आहे. १८ नोव्हेंबरपर्यंत केवायसी करता येणार आहे. त्यामुळे फक्त काही दिवस उरले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने केवायसी करायची आहे. केवायसी केल्याशिवाय महिलांना पुढचा हप्ता मिळणार नाहीये. यासाठीची संपूर्ण प्रोसेस ऑनलाइन होणार आहे.