पिएम किसानचा हप्ता कधी येनार ; पीएम किसान सन्मान निधीचा पुढील हप्ता कधी जमा होणार, याची अनेक शेतकरी वाट पाहत आहेत. बिहार विधानसभेच्या निवडणुका सुरू असल्याने सध्या देशभरात आचारसंहिता लागू आहे. ही आचारसंहिता १३ नोव्हेंबरनंतर निवडणुकांचा निकाल लागल्यावर संपुष्टात येणार आहे. निवडणूक आयोगाकडून परवानगी न मिळाल्यामुळे, केंद्र सरकारने आचारसंहितेच्या काळात हा हप्ता वितरित केलेला नाही. यापूर्वी पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड नैसर्गिक आपत्तीग्रस्त राज्यांमध्ये आगाऊ हप्ता वितरित करण्यात आला होता. परंतु, सर्वसाधारण हप्त्यासाठी आचारसंहिता संपण्याची अट असल्याने, पुढील हप्ता १३ नोव्हेंबरनंतरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे.
वार्षिक ९,००० रुपये मिळणार का?
सध्या सोशल मीडियावर काही व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत वार्षिक ९,००० रुपये मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु, यामागची सत्यता वेगळी आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) शेतकऱ्यांसाठी एक वचननामा दिला होता. यात त्यांनी केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या ६,००० रुपयांसोबतच, बिहार राज्य सरकारच्या वतीने आणखी ३,००० रुपये देण्याची घोषणा केली होती, ज्यामुळे एकूण रक्कम ९,००० रुपये होणार होती.












