राज्यात पुन्हा पाऊस येणार का नवीन अंदाज ; हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज ४ नोव्हेंबर २०२५ रोजी नवीन हवामान अंदाज दिला आहे. सध्या राज्यामध्ये पाऊस येणार, अशा अनेक बातम्या आणि चर्चा सुरू आहेत. या चर्चा ऐकून शेतकरी बांधवांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
पंजाब डख म्हणतात की मी राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना स्पष्टपणे सांगू इच्छितो की, ७ नोव्हेंबरच्या नंतर राज्यात कोणताही मोठा पाऊस येणार नाही. उलट, ७ तारखेपासून पाऊस पूर्णपणे निरोप घेणार असून, राज्यात थंडीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे पावसाच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये.
सध्या जो काही पावसाचा अंदाज आहे, तो फक्त आज आणि उद्या, म्हणजेच ४ आणि ५ नोव्हेंबर या दोन दिवसांपुरताच मर्यादित आहे. या दोन दिवसांमध्ये होणारा पाऊस हा अतिशय किरकोळ आणि विखुरलेल्या स्वरूपाचा असणार आहे.
हा तुरळक पाऊस प्रामुख्याने सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागांमध्ये राहील. यासोबतच लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, बीड जिल्हा, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्याच्या काही पट्ट्यांमध्ये आज आणि उद्या थोडा विखुरलेला पाऊस दिसू शकतो.
शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे की, हा पाऊस फक्त दोनच दिवस (४ आणि ५ नोव्हेंबर) राहील आणि तोही खूप जोराचा नसेल. त्यामुळे पावसाच्या अफवांवर विश्वास न ठेवता, हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा.