वडील वारले,पतीही नाही हयात ; लाडक्या बहीणी आल्या अडचणीत..पहा काय करावे ; महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असला तरी, ई-केवायसीदरम्यान पती किंवा वडिलांचे आधार कार्ड देणे आवश्यक असल्याने अनेक महिलांची मोठी अडचण झाली आहे.
वडील-पतीच्या ‘आधार’ वरून तपासणार उत्पन्न
ई-केवायसी प्रक्रियेत लाभार्थी महिलेला स्वतच्या आधार क्रमांकासोबतच पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक देणे अनिवार्य करण्यात आले आहे. वा आधार क्रमांकांच्या माध्यमातून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तपासले जाणार आहे.
लाभासाठी ई-केवायसी बंधनकारक
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभघेणाऱ्या सर्व महिलांना आता ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. योजनेतील अपात्र लोकांना वगळण्यासाठी आणि गरजू महिलांनाच नियमितपणे लाभ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ई-केवायसी न करणाऱ्या महिलांना पुढील हप्ता मिळण्यास आडचन येऊ शकते.
घटस्फोटितांची अडचण
ई-केवायसीसाठी पती किया वडिलांचा आधार क्रमांक बंधनकारक केल्यामुळे अनेक महिलांची मोठी अडाण झाली आहे. ज्या महिलांचे वडील वारले आहेत आणि पती हयात नाहीत किया घटस्फोट झाला आहे, अशा महिलांना ई-केवायसी पूर्ण करताना आधार क्रमांक उपलब्ध नसल्याने अडचणी येत आहेत.
कुटुंबातील इतर सदस्यांचा पर्याय देण्याची मागणी
पती किंवा वडील हयात नसलेल्या किंवा घटस्फोटित महिलांना येणारी अडचण लक्षात घेता, कुटुंबातील सदस्य किंवा सासरकडील सदस्याचा आधार क्रमांक वापरण्याचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली.
१८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीसाठी सध्या १८ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत सर्व पात्र महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
कुठे आणि कशी करायची ई-केवायसी
ई-केवायसी प्रक्रिया योजनेच्या https://ladakibahin maharashtra gov.in या संकेतस्थळावर करता येते. आवश्यक माहिती भरून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येते.
अर्जाची होणार पडताळणी
जिल्ह्यात एकाच कुटुंबात दोनपेक्षा जास्त लाभार्थी तसेच २१ वर्षापेक्षा कमी व ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या अर्जाची पडताळणी करण्याचे काम सुरू आहे.