लाडक्या बहीणींनो E-KYC साठी उरले फक्त एवढे दिवस..हि आहे शेवटची तारीख ; लाडक्या बहीण योजनेच्या सर्व पात्र भगिनींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची सूचना आहे. तुम्हाला मिळणाऱ्या मासिक हप्त्यात कोणताही खंड पडू नये यासाठी (E-KYC) १८ नोव्हेंबर ही अंतिम मुदत गांभीर्याने लक्षात घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही १८ नोव्हेंबर पर्यंत ‘ई-केवायसी’ (eKYC) प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर तुम्हाला पुढील हप्ता मिळणे बंद होऊ शकते. त्यामुळे, ज्या भगिनींनी अजून ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत दिरंगाई न करता तात्काळ ही कार्यवाही करणे अनिवार्य आहे…
राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून हे महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे. लाडक्या बहीण योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या प्रक्रियेसाठी सप्टेंबर १८ ते नोव्हेंबर १८ असा दोन महिन्यांचा पुरेसा कालावधी देण्यात आला होता. बहुतांश भगिनींनी त्यांची ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण केली असली तरी, काही भगिनींनी अजूनही ई केवायसी केलेली नाही. अशा सर्व भगिनींनी ही अंतिम मुदत चुकवू नये; कारण ई-केवायसी पूर्ण न झाल्यास, नियमांनुसार तुमचा हप्ता थेट थांबवला जाऊ शकतो.
योजनेचा लाभधारक म्हणून तुमचा हक्क कायम ठेवण्यासाठी, ई-केवायसीची प्रक्रिया अचूक आणि यशस्वीरित्या पूर्ण करणे हे तुमच्या हिताचे आहे. अनेक भगिनींनी घरी बसून, आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. जर तुम्हाला ई-केवायसी कशी करावी याबद्दल माहिती हवी असेल,तर या लिंकवर https://srtcollegedhamri.com/लाडकी-बहीण-kyc-3/ टच (क्लिक) करा.
हा अत्यंत महत्त्वाचा विषय असल्यामुळे, तुमच्या संपर्कातील प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत ही माहिती लवकरात लवकर पोहोचवा आणि त्यांना १८ नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसी पूर्ण करण्यास सांगा. हा केवळ संदेश नसून, तुमच्या आर्थिक लाभाच्या संरक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना आहे…