स्मार्ट रेशन कार्ड ; केंद्र सरकारने जुन्या रेशन कार्ड्सची जागा आता हळूहळू स्मार्ट रेशन कार्डने घेण्याचे धोरण सुरू केले आहे. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याकडे स्मार्ट रेशन कार्ड असणे आवश्यक आहे.
ही महत्त्वपूर्ण सुविधा आता तुम्ही अवघ्या दोन मिनिटांत तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून घरबसल्या पूर्ण करू शकता. यासाठी तुम्हाला भारत सरकारच्या ‘मेरा रेशन’ (Mera Ration) या अधिकृत ॲपचा वापर करावा लागेल. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा भाग असलेल्या या ॲपद्वारे तुम्ही तुमचे नवीन रेशन कार्ड काही सोप्या स्टेपमध्ये डाऊनलोड करू शकता.
असे करा स्मार्ट रेशनकार्ड डाउनलोड
तुमचे स्मार्ट रेशन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअरवरून ‘मेरा रेशन’ हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून ओपन करायचे आहे. ॲप उघडल्यानंतर, तुम्हाला ‘बेनिफिशरी युजर’ (Beneficiary User) या पर्यायावर स्पर्श करून लॉगिन करावे लागेल.
लॉगिन करण्यासाठी, तुमचा आधार नंबर आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा (Captcha) जसाच्या तसा भरावा. माहिती भरल्यानंतर ‘Login with OTP’ या बटणावर क्लिक करा. यानंतर, तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर सहा अंकी ओटीपी (One-Time Password) येईल. हा ओटीपी प्रविष्ट करून व्हेरिफाय केल्यास तुमचे लॉगिन यशस्वी होईल.
ओटीपी व्हेरिफाय होताच, तुमच्या कुटुंबाचे नवीन स्मार्ट रेशन कार्ड स्क्रीनवर दिसेल. हे कार्ड डाऊनलोड करण्यासाठी, स्क्रीनवर दिसणाऱ्या खालील दिशेने असलेल्या बाणाच्या (Download) चिन्हावर स्पर्श करा. एका सेकंदात तुमचे स्मार्ट रेशन कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये पीडीएफ (PDF) स्वरूपामध्ये डाऊनलोड झालेले दिसेल.
डाऊनलोड केलेल्या या रेशन कार्डमध्ये लाभार्थ्यांचे पूर्ण नाव, आरसी नंबर (RC Number) आणि तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची सविस्तर माहिती नमूद केलेली असते. ही प्रक्रिया पूर्ण करून तुम्ही तुमचे डिजिटल रेशन कार्ड सुरक्षित ठेवू शकता.