लाडक्या बहीणींचा हप्ता 2100 होनार, पहा ताजी अपडेट
लाभार्थ्यांना 1500 रूपयांऐवजी 2100 रुपयांचा सन्माननिधी जमा होण्याची शक्यता बळावली आहे…..कारण, मंत्री नरहर झिरवळ यांनी या योजनेविषयी मोठे संकेत दिले आहे.
मंत्री नरहर झिरवळ यांनी गरज पडल्यास सन्मानिधीत लवकरच वाढ करण्याचा विचार करण्यात येईल, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना मोठी आर्थिक मदत मिळेल असे ते म्हणाले. पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे आयोजीत सभेत त्यांनी हे वक्तव्य केले. त्यामुळे आता 2100 रुपये हप्ता कधी मिळेल याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे…
लाडक्या बहीणींना कर्ज मिळनार, आदीती तटकरे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत लाभार्थी महिलांना आता कर्ज पुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दादर शाखेने व्यावसायिक कर्ज योजनेतून 57 महिलांना कर्ज पुरवठा केला आहे. त्या धनादेशांचे वाटप मंत्री आदिती तटकरे यांनी केले.
हा कर्ज धनादेश म्हणजे केवळ आर्थिक मदत नाही, तर राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांच्या उद्योजकतेला, त्यांच्या आत्मविश्वासाला दिलेले बळ असल्याची प्रतिक्रिया तटकरे यांनी दिली. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी सुद्धा लवकरच ही योजना लागू करण्यात येणार आहे.