Cyclone Motha ; मोंथा चक्रीवादळाचे परीणाम रामचंद्र साबळे हवामान अंदाज
मोंथा चक्रीवादळ : मोथा चक्रीवादळ (Cyclone Motha) आंध्रप्रदेशातून तेलंगणात दाखल झाल्यामुळे महाराष्ट्रावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी शेतकऱ्यांना पुढील हवामान अंदाज वर्तवला आहे.
विदर्भ: वादळ उत्तरेच्या दिशेने सरकत असल्यामुळे, विदर्भ, मध्य विदर्भ आणि पूर्व विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
कोकण: अरबी समुद्रातही ढग जमा झाले असून, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
मराठवाडा: नांदेड, परभणी, आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र: कोल्हापूर, पुणे, आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.
उघडीप: शनिवार, १ नोव्हेंबर पासून पावसाचे प्रमाण कमी होऊन उघडीप मिळण्याची आणि प्रखर सूर्यप्रकाश राहण्याची शक्यता आहे.
पावसाचा अंदाज (मिलिमीटरमध्ये):
कोकण (रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी): ४ ते ३५ मिमी
उत्तर महाराष्ट्र (नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव): ४ ते ३५ मिमी
मराठवाडा (बीड, नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर): ४ ते २० मिमी
विदर्भ (बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली): ३ ते २३ मिमी
पश्चिम महाराष्ट्र (कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर): १० ते २५ मिमी
रामचंद्र साबळे कृषी सल्ला
कोकण: भात कापणी आणि मळणीची कामे पावसात उघडीप पाहून करावीत
रब्बी पिके: रब्बी ज्वारी आणि हरभरा पिकांच्या पेरण्या पूर्ण कराव्यात.