IMD Weather Update आवकाली पावसाचा मुक्काम काढला पहा हवामान अंदाज
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे आगमन थांबता थांबत नाहीये. मान्सून संपल्यानंतरही अनेक भागांमध्ये जोरदार ते अतिमुसळधार पाऊस सुरूच आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी राज्यात पावसाचा अलर्ट जारी केला असून नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहनसुद्धा करण्यात आले आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले मोंथा चक्रीवादळ सध्या आंध्रप्रदेश व ओडिशामध्ये धडकले असून त्याचा प्रभाव महाराष्ट्रातही दिसून येत आहे. या वादळामुळे कोकण किनारपट्टी, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
IMD Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे आगमन थांबता थांबत नाहीये. मान्सून संपल्यानंतरही अनेक भागांमध्ये जोरदार ते अतिमुसळधार पाऊस सुरूच आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी राज्यात पावसाचा अलर्ट जारी केला असून नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहनसुद्धा करण्यात आले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले मोंथा चक्रीवादळ सध्या आंध्रप्रदेश व ओडिशामध्ये धडकले असून त्याचा प्रभाव महाराष्ट्रातही दिसून येत आहे. या वादळामुळे कोकण किनारपट्टी, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील बदलत्या वातावरणामुळे कोकण किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत आहेत. समुद्र खवळलेला असून मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस कोकणामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः विदर्भातील जिल्ह्यांमध्ये कापूस आणि धान्यांची कापणी सुरू असताना पावसाने हजेरी लावल्याने पिके ओलावली असून ती सडण्याची शक्यता वाढली आहे. चंद्रपूर, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
हवामान विभागानुसार, मोंथा चक्रीवादळाचे रूपांतर आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले असून ते उत्तर दिशेने सरकत आहे. गुरुवारपर्यंत हे क्षेत्र विदर्भालगत राहणार असून, शुक्रवारपर्यंत मध्य प्रदेश आणि त्यानंतर उत्तर प्रदेश व बिहारकडे सरकणार आहे. त्यामुळे या भागात पुढील तीन दिवस वाऱ्यासह पावसाची शक्यता कायम राहील. हवामान विभागाने नागरिकांना अनावश्यक बाहेर पडणे टाळण्याचे तसेच आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. किनारपट्टीवरील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवली आहे.