PM Kisan 21st Installment ; कधी येनार खात्यात… मोठी अपडेट
PM Kisan 21st Installment : देशातील कोट्यवधी शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या २१ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. सरकार दिवाळीच्या आधी २ हजार रुपयांचा हप्ता जारी करेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. पण २१ वा हप्ता खात्यात कधी जमा करणार? याबाबत सरकारकडून अद्याप काही सांगण्यात आलेले नाही.
दरम्यान, आता असे दिसून येते की सरकार दिवाळीत पीएम किसानचे पैसे जमा करणार नाही. तर पुढील हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हस्तांतरित होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
काही रिपोर्टनुसार, केंद्र सरकारकडून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात २१ वा हप्ता जारी केला जाऊ शकतो. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या काही दिवस आधी याबाबत घोषणा होऊ शकते, असे मानले जात आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ६ आणि ११ नोव्हेंबर असे दोन टप्प्यात मतदान होणार आहे. तर निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होईल. दरम्यान, बिहारमध्ये आचारसंहिता लागू असल्याने निवडणूक काळात सरकार पीएम किसानचा हप्ता जारी करेल की नाही, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, तज्ज्ञांच्या मते, निवडणूक आचारसंहितेच्या काळात सरकार कोणतीही नवीन योजना जाहीर करु शकत नाही. पण पूर्वी मंजूर केलेल्या योजनांचे पेसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात.
‘या’ शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही
ज्या शेतकऱ्यांनी ई- केवायसी (eKYC) पूर्ण केलेली नाही अथवा ज्यांचे बँक खाते आधारशी लिंक केलेले नाही, त्यांना या योजनेचा हप्ता मिळणार नाही, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.