मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी (eKYC) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. तुम्ही ही प्रक्रिया अगदी कमी वेळेत कशी पूर्ण करू शकता, याची सविस्तर माहिती खाली दिली आहे.
टप्पा १: अधिकृत पोर्टलवर जाणे
सर्वप्रथम, तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर गुगल उघडा.
ladkibahine.maharashtra.gov.in या नावाने सर्च करा.
सर्च केल्यानंतर दिसणारी पहिली अधिकृत वेबसाईट उघडा.
टप्पा २: ई-केवायसी सुरू करणे
पोर्टल उघडल्यावर, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा” या पर्यायावर टच करा.
लाभार्थी महिलेचा (तुमचा) आधार नंबर काळजीपूर्वक भरा.
दिलेला कॅप्चा (Captch) व्यवस्थित टाका.
“मी सहमत आहे” या बटनावर टच करून “ओटीपी पाठवा” या पर्यायावर क्लिक करा.
टप्पा ३: लाभार्थी महिलेची पडताळणी (पहिला OTP)
तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर सहा अंकी ओटीपी (OTP) येईल.
तो ओटीपी दिलेल्या रकान्यात भरून “सबमिट” या बटनावर टच करा.
टप्पा ४: कुटुंबातील सदस्याची पडताळणी (दुसरा OTP)
पुढील पेजवर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्याचा आधार नंबर टाकावा लागेल.
विवाहित महिलांसाठी: तुमच्या पतीचा आधार नंबर टाकावा.
अविवाहित महिलांसाठी: तुमच्या वडिलांचा आधार नंबर टाकावा.
आधार नंबर टाकल्यानंतर खालील कॅप्चा व्यवस्थित भरून “मी सहमत आहे” यावर टच करा आणि नंतर “ओटीपी पाठवा” या बटनावर क्लिक करा.
ज्या सदस्याचा आधार नंबर टाकला आहे, त्यांच्या मोबाईलवर आलेला सहा अंकी ओटीपी भरून “सबमिट करा” या बटनावर टच करा.
टप्पा ५: आवश्यक माहिती भरणे व घोषणा
आता तुमच्यासमोर ई-केवायसी फॉर्मचा पुढील भाग उघडेल, जिथे तुम्हाला काही माहिती भरायची आहे:
जात प्रवर्ग (Cast Category): सर्वप्रथम, तुमचा जात प्रवर्ग (उदा. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इ.) यादीतून व्यवस्थित निवडा.
घोषणा १ (सरकारी कर्मचारी/निवृत्ती वेतन): “माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत नाहीत.”
या वाक्यात ‘नाहीत’ असा उल्लेख असल्यामुळे तुम्हाला ‘होय’ (Yes) हा पर्याय निवडायचा आहे.
घोषणा २ (लाभार्थी संख्या): “माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे.”
तुम्ही एकट्याच या योजनेचा लाभ घेत असाल (विवाहित किंवा अविवाहित), तर तुम्हाला ‘होय’ (Yes) हा पर्याय निवडायचा आहे. जर कुटुंबातील दोन महिला (उदा. दोन विवाहित) लाभ घेत असतील, तर ‘नाही’ निवडा.
खाली दिलेल्या “टर्म्स आणि कंडिशन” (नियम व अटी) बॉक्सवर टिक मार्क करा.
“सबमिट” बटनावर टच करा.
टप्पा ६: ई-केवायसी यशस्वी
“ई-केवायसी सक्सेसफुल” असा मेसेज तुमच्या स्क्रीनवर दिसेल. तुमची ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे.
टीप: ही प्रक्रिया पूर्ण करताना तुमचे आ